तोते की प्रजाति

पोपट मराठी निबंध – वाचा येथे Parrot Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमच्या भारत देशामध्ये विभिन्न प्रकारचे पक्षी आढळतात. त्या सर्व पक्ष्यांमध्ये पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. तसेच पोपट हा पाळीव पक्षी सुद्धा आहे.

पोपट हा पक्षी माध्यम आकाराचा आहे आणि हा पक्षी उबदार भागात जास्त प्रमाणात आढळतो. काही लोक पोपटाला आपल्या घरामध्ये पाळतात.

आपल्या भारत देशामध्ये पोपट हा पक्षी हिरव्या रंगामध्ये आढळून येतो. तर इतर देशांमध्ये तो पांढरा, निळा, पिवळा आणि लाल या रांगांमध्ये आढळतो.

पोपटाची रचना

Parrot पोपट हा एक रंगबिरंगी पक्षी आहे. त्याची चोच वक्र आणि लाल असते. तसेच पोपटाचे पंख हे हिरव्या रंगाचे असतात. पोपटाच्या गळ्यामध्ये एक काळया रंगाची रिंग असते. म्हणून हा पक्षी दिसायला खूप सुंदर दिसतो.

पोपटाचा जीवनकाळ हा १५ ते २० वर्ष एवढा असतो. पोपट हा एक हुशार पक्षी आहे. कारण माणसाने त्याला जर काही शिकवलं तर तो माणसाचे भाषण सुद्धा बोलू शकतो.

पोपटाचे खाद्य

Parrot पोपट या पक्ष्याला मिरची खूप आवडते. तसेच तो धान्य, फळे, पेरू आणि पाने सुद्धा खातो. पोपट या पक्ष्याला उकडलेला भात खाणे सुद्धा आवडते. त्याच बरोबर तो कठीण कवचाची फळे खातो.

पोपट कुठे राहतो

Parrots पोपट हा पक्षी ज्यादातर तो उबदार भागात आढळून येतो. तसेच त्याला थंड ठिकाणी राहणे आवडत नाही. पोपट हा पक्षी झाडांच्या कपाळावर घरटे बांधून राहतो. तो घरटे बनवतो आणि त्यात अंडी घालतो. तो वर्षातून दोनदा अंडी घालतो.

पोपट या पक्ष्याला सहसा झुंडमध्ये राहायला आवडते. जेव्हा – जेव्हा ते अन्नाच्या शोधात असतात तेव्हा ते १० ते १५ पोपटांच्या कळपातून जातात.

पोपटाच्या प्रजाती

तोते की प्रजातिसंपूर्ण जगभरात पोपट या पक्ष्याच्या ३५० हुन अधिक प्रजाती सापडल्या आहेत. पोपट हा एक एकमेव पक्षी आहे ज्याच्या सर्वात जास्त प्रजाती आढळतात.

भारत देशात आढळणारा पोपट

तोते और मनुष्यआमच्या भारत देशामध्ये आढळणाऱ्या लहान पोपटाचे शास्त्रीय नाव ‘लोरिक्युलस व्हर्‌नॅलिस’ असे आहे. हा पोपट साधारणतः चिमणी एवढा असतो. हा पोपट लहान झाडे, कळकांची वने, फळांच्या बागा आणि मळ्यात राहतो.

या पोपटाची शेपटी मोठ्या पोपटांच्या तुलनेत आखूड असते म्हणून याला ‘लांडा पोपट’ असे सुद्धा म्हटले जाते.  हा पोपट हिरव्या झाडांच्या फांदीवर बसला तरी ओळखता येत नाही.

मुख्य निवास स्थान

तोते का जीवनपोपट या पक्ष्याचे मुख्य निवास स्थान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहे. येथे पोपट हा पक्षी रंगीबेरंगी रंगात आढळतो. तसेच त्याला पकडून इतर देशात पाठवला जातो.

माणसाची भाषा

तोते की शरीर रचना 1पोपट हा पक्षी एवढा शहाणा असतो कि, त्याला काही दिवस माणसांमध्ये राहिला तर तो त्यांचे शब्द शिकतो आणि त्याची नक्कल करण्यास सुरुवात करतो.

आपल्या भारत देशामध्ये पोपटांना ज्यादातर तो राम – राम आणि सीताराम शब्द बोलायला शिकवले जातात. जेव्हा घरी कोणी येत तेव्हा पाहुण्यांचे स्वागत तो राम – राम आणि सीताराम बोलून करतो.

निष्कर्ष:

पोपट हा एक खूप सुंदर पक्षी आहे. म्हणून काही मुलांना हा पक्षी अत्यंत आवडतो. तर बरेच काही लोक अद्भुत गोष्टी करण्यासाठी पोपटांचा शो प्रदान करून चांगले जीवन जगतात.

मराठीतील पोपट निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment