रक्षाबंधन वर निबंध मराठी – वाचा येथे Raksha Bandhan Essay in Marathi

प्रस्तावना:

भारत देशामध्ये विविध प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी रक्षाबंधन हा हिंदू धर्माचा महत्वाचा आणि प्रमुख सण आहे.

रक्षाबंधन हा सण देशातील विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारत देशातील विविध धर्माचे आणि जातीचे लोक हा सण साजरा करतात.

रक्षाबंधन म्हणजे –

रक्षाबंधन म्हणजे भावा – बहिणीच्या प्रेमाचे बंधन होय. तसेच रक्षाबंधन या सणाला राखी पोर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. राखी पूर्णिमा म्हणजेच बहिण – भावाच्या हळव्या नात्याची रेशमी धाग्यातून गुंफण होय.

रक्षाबंधन हा सण केव्हा साजरा केला जातो –

रक्षाबंधन हा सण हिंदू कॅलेंडर नुसार श्रावण महिन्या मध्ये साजरा केला जातो. हा सण मुख्यत: ऑगस्ट महिन्यामध्ये येतो. पश्चिम भारतात ‘नारळी पोर्णिमा’ या नावाने साजरा केला जातो.

श्रावण महिना हा हिंदू धर्माप्रमाणे शुभ मानला जातो. कारण हिंदू धर्माचे सगळे सण हे श्रावण महिन्यापासूनच सुरु होतात.

रक्षाबंधनची तयारी

रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ आणि बहिणी सुंदर आणि नवीन कपडे घालतात. त्यानंतर बहिण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा तिला लावतात.

बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते आणि मिठाईची देवाण – घेवाण करते. तसेच बहिण आपल्या ओवाळते आणि त्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करते.

तसेच भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात आणि त्यांना वचन देतात कि, सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतील. या दिवशी भाऊ – बहिण राखी बांधण्यापूर्वी उपवास ठेवतात आणि राखी बांधून झाल्यावर उपवास सोडतात.

राखीचा धागा

राखीचा धागा हा नुसताच दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे बंधन आहे. ह्या छोट्याश्या धाग्याने अनेक मने जुळून येतात.

त्यांच्या भावनांना ओलावा मिळतो आणि मन प्रफुल्लीत होते. सर्व लोकांना एकत्र जोडणारा हा सण अन्य कोणत्याही धर्मामध्ये नाही.

रक्षाबंधनची कथा

जेव्हा इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते तेव्हा त्यांच्या उन्ज्व्या हातावर इंद्राणीने राक्षसुत्र बांधले. त्यामुळे इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी दानवांवर विजय प्राप्त केला. तसेच महाभारतामध्ये श्रीकृष्णाच्या बोटाला होऊन जखम होऊन रक्त वाहत होते.

त्यावेळी पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून बोटाला बांधले होते. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला.

रक्षाबंधन (सुरक्षतेचे बंधन)

रक्षाबंधन हे सुरक्षतेचे स्मारक आहे. राखी बांधल्यावर आपल्यावर एक बंधन असते. ते बंधन म्हणजे सुरक्षतेचे.

राखी सदैव ध्येयाच्या वाटेने वाटचाल करण्याची आठवण करून देते. तसेच बहिण आपल्या भावाला राखी बांधते तेव्हा हे बंधन रक्षण करण्याची सूचना देते.

भाऊ – बहिण यांचे नाते

स्त्री कितीही मोठी असोत आणि कितीही मिळवती झाली तरी तिची जबाबदारी ही भावावरच असते.

यामध्ये तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास आहे. भाऊ – बहिण हे रक्ताचे असोत किंवा मानलेले असोत, पण त्यामागची भावना पवित्र आणि खरी असते. या नात्यामागची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पोर्णिमा.

म्हणून ज्या बहिणीला भाऊ नसतो ती चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळते. म्हणून आई ही आपल्या लहान मुलाला चांदोमामा म्हणून ओळख करुन देते. त्याच बरोबर या दिवशी तूच आमचा दाता, रक्षणकर्ता म्हणून देवाला सुद्धा राखी वाहतात.

निष्कर्ष:

रक्षाबंधन हा सण आम्हा सर्वाना असा संदेश देतो कि, आपण सर्वांनी स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता पवित्र दृष्टीने पहिले पाहिजे.

रक्षाबंधन हा सण भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आणि बहिण – भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर झरा आहे.

मराठीतील रक्षाबंधन निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.

Updated: November 13, 2019 — 12:41 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *