मुलींचे शिक्षण निबंध – वाचा येथे Mulinche Shikshan Essay In Marathi

मुलींचे शिक्षण:

आज आपल्याला कितीही वाटले की मुलगी शिकली प्रगती झाली तरी हे तितका अजून प्रगत नाही झालेला.

मुलगी शिकली प्रगती झाली?

आजही आपण पाहतो की मुलींना शिक्षणाचा फारसा फायदा मिळत नाही. गावोगावी अजून ही मुलींना फक्त चूल आणि मूल हेच शिक्षण मिळत आहे.

आपल्या देशातील थोर महिला

सावित्री बाई फुले, रमाबाई रानडे, रमाबाई आंबेडकर, अश्या अनेक थोर महिला आपल्या देशाला लाभल्या. त्यांना ही घराबाहेर पडण्यास मनाई होती. चूल मूल यातच त्या जगात होत्या, पण त्यांच्या यजमानि त्यांना प्रोत्साहन दिले लोकांच्या मानहानी ला न जुमानता लोकांचा रोष पत्करून आपल्या पत्नीने शिक्षण घेऊन पुढे यावे या साठी खूप अतोनात प्रयत्न केले,

त्यांच्या या प्रयत्नांना यश ही मिळाले, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांच्या या ध्याया मुळे आजच्या युगातील मुली खूप शिकून प्रगत झाल्या आहेत.

इंदिरा गांधी, कल्पना चावला, सानिया मिर्झा, पी.टी. उषा, प्रतिभा ताई पाटील अशी खूप नाव आहेत ज्यांनी या देशाचे नाव केले आहे.

मुलगी खरच शिकली का

आजही ग्रामीण भागात, आदिवासी समाजात मुली अशिक्षित आहेत, परिस्थिती मुले आणि समाजाच्या जुन्या जुनाट रूढींमुळे त्यांना शिक्षण मिळत नाही, आजही आपला समाज इतका मागासलेला आहे की आपल्या मुलींना लहान वयातच लग्न करून पाठवून दिले जाते. कारण असे नाहीं केले तर समाजातून आपल्याला बाहेर काढले जाईल, आपल्यावर बहिष्कार टाकला जाईल या भीतीने अजूनही पालक घाबरतात.

आदिवासी समाजात

पण आता काही लोकांना समाजाची जाणीव झाली आहे, पण मुलीची जात बाहेर शिक्षणासाठी कसे पाठवायचे, कारण आजच्या जमान्यात मुली सुरक्षित नाहीत, या कल्पनेने आई-वडील घाबरत आहेत , करण आपल्या गावात शिक्षणाची सोय नाही त्यासाठी दूर दुसऱ्या गावाला जावे लागते त्यामुळे सुद्धा आपला समाज कमकुवत होत आहे. पण आपल्या शहरी भागात याचे प्रमाण कमी आहे, मुली आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत उच्च शिक्षण घेऊन त्या आज देशाचे नाव करत आहेत चूल मूल आणि नोकरी सुद्धा करत आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत, तिला ही तेवढाच समान हक्क मिळाला आहे.

आपल्या पहिल्या पंतप्रधान

इंदिरा गांधी या आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या, प्रतिभाताई पाटील या आपल्या देशाला राष्ट्रपती म्हणून लाभल्या त्यांनी पाच वर्षे हे पद सांभाळले. आजही कित्येक महिला मंत्री पदावर आपल्याला दिसत आहेत. जर त्यांना ही रुढी परंपरा यांची दोरी गळ्यात बांधून बसवले असते तर आज आपल्याला इतक्या महान कार्यकर्त्या लाभलया नसत्या.  पण त्यानी उच्च शिक्षण घेऊन पुरुषानं सोबत खांद्याला ला खंदा लावून देश चालवत आहेत.

जगातली फास्ट रनर

पी.टी. उषा सारखी फास्ट रनर आपल्या देशाला मिळाली एका छोट्याश्या गावातून आलेली ही मुलगी अर्जुन पुरस्काराने, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अंतरिक्षातील पहिली झेप

कल्पना चावला ही आपल्या देशातील पहिली महिला होती जिने १९९७ मध्ये अंतरिक्षात झेप घेतली होती.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिडशे वर्षांपूर्वी मुलींसाठी शाळा सुरू केली त्याचा आज आपल्या आत्ताच्या पिढीला किती फायदा झाला याची आपण कल्पना नाही करू शकत.

जुनाट परंपरां

आजही आपण पाहतो आपली आजी पणजी यांच्या कडून ऐकतो त्या काळातल्या त्यांच्या चालीरीती त्यांना न मिळलेले शिक्षण जुनाट परंपरांमध्ये त्या कश्या वावरल्या, त्यावरून आज त्यांना आपल्या कडे पाहून खूप आनंद होतो.

माझा अभिमान

माझी आई खूप शिकलेली नाही पण तिने आम्हाला उच्च शिक्षण दिले, जगात उभी राहण्याची क्षमता दिली, म्हणून आज मी कुठेही कमी नाही समजत स्वतःला.

आज मुली डॉक्टर, इंजिनिअर, नायिका, पायलट, शेती, या सर्व क्षेत्रात खूप आघाडीवर आहेत. पण तिला आपल्या सर्व गोष्टींची जाणिव सुद्धा आहे, की ती कुणाची आई, बहीण, पत्नी सुद्धा आहे. हे सर्व सांभाळून ती आपले बाहेर चे काम तितकीच आवडीने व मन लावून पूर्ण करत आहे.

सारांश:

खरंच मुलगी शिकवली पाहिजे.

Updated: March 18, 2020 — 6:31 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *