दिवाळी मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Diwali

प्रस्तावना

आमची भारती भूमी ही सणांची भूमी आहे. या भूमीवर अन्य प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी दिवाळी हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे.

दिवाळी हा सण संपूर्ण भारतमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच या सणाला दिपावली असे सुद्धा म्हटले जाते. दिवाळी हा सण विविध धर्माचे आणि जातीचे लोक मोठ्या आनंदाने साजरे करतात.

असे म्हटले जाते कि, दिवाळी हा सण प्रकाशाचा, आनंदाचा, प्रेमानी भरलेला आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. तसेच दिवाळी हा सण प्रकाशाचा सण आहे.

दिवाळी शब्दाचा अर्थ 

हिंधू धर्मा मध्ये दिवाळी सणाला विशेष महत्त्व दिले जाते. दिवाळी या शब्दाचा अर्थ होतो – प्रकाशाचा उत्सव. संस्कृतमध्ये दिवाळी या शब्दाला दिपावली असे म्हटले जाते. ज्याचा अर्थ होतो – दिव्यांची रांग.

दिवाळी केव्हा साजरी केली जाते 

भारत देशामध्ये दरवर्षी दिवाळी हा सण हिंदू कॅलेंडरनुसार आश्विन महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो. तसेच हा सण प्रामुख्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यामध्ये येतो.

दिवाळी का साजरी केली जाते 

भारत देशामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणामागे पौराणिक, धार्मिक किंवा ऐतिहासिक कथा असते. त्याच प्रमाणे दिवाळी या सणामागे आहे.

दिवाळीचा तोच दिवस ज्या दिवशी भगवान श्रीराम त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण हे तिघे १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या अयोध्या नगरीत परत आले.

म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्या वासियांनी तुपाचे दिपक लावून त्यांचे स्वागत केले होते. हे तिघे ज्या दिवशी परत आले होते ती अमावस्येची रात्र होती. म्हणून तुपाचे दिवक लावून प्रकाशमय केले होते.

दिवाळी हा सण

दिवाळी हा पांच दिवसांचा सण आहे. दिवाळीचे पांच दिवस रिती – रिवाज आणि परंपरेनुसार साजरे केलजातात.

धनत्रयोदशी

दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. यादिवशी नवीन सोन्या – चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी धनाची देवी धन्वंतरीची पूजा केली जाते.

नरक चतुर्थी

दिवाळीचा दुसरा दिवस हा नरक चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला छोटी दिवाळी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून हा दिवस नरका चतुर्थी या नावाने ओळखला जातो.

दिवाळी – लक्ष्मीपूजन

दिवाळीचा तिसरा दिवस हा मोठी दिवाळी म्हणून साजरा केला जातो. हा दिवाळीचा तिसरा दिवस सर्वात महत्वाचा दिवस आहे, या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्रीगणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाती.

तसेच यादिवशी अंगणात रांगोळी काढली जाते. त्याच बरोबर लहान – थोर माणसे फटाके फोडून आपला आनंद व्यक्त करतात.

यादिवशी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि एकमेकांना गोड पदार्थ खाऊ घातले जातात.

पाडवा

दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो. या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांची गोवर्धन पूजा केली जाते. गावातील लोक पाडव्याच्या दिवशी गाय, बैल आणि म्हशी यांची पूजा करतात.

भाऊबीज

दिवाळीचा पांचवा दिवस हा भाऊबीज म्हणून साजरा कला जातो. हा दिवस बहिण – भावाच्या अतूट प्रेमाच्या नात्याला जोपासणारा असतो.

या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या समृद्धी आणि भरभराटीची शुभकामना करते. भाऊ आपल्या बहिणीला उपहार देऊन खुश करतात.

निष्कर्ष

दिवाळी हा सण भारत देशातील सणांचा महत्वाचा आणि सुंदर सण आहे. तसेच हा भारत देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन सण आहे.

भारत हा एक असा देश आहे, जिथे सर्व धर्माचे लोक एकसाथ सर्व सण साजरे करतात. तसेच हा सण असत्यावर सत्याचा विजय आणि अंधारावर प्रकाश निर्माण करणारा मांगल्याचे प्रतीक मनाला जातो.

For any other query regarding the Marathi Essay on Diwali, you can ask us by leaving your comment below.

Updated: November 5, 2019 — 11:44 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *