गाय वर निबंध – वाचा येथे Marathi Essay on Cow

प्रस्तावना

आमच्या भारत देशामध्ये अन्य प्रकारची जंगली आणि पाळीव प्राणी पाहायला मिळतात. त्या सर्व पाळीव प्राण्यांपैकी गाय ही एक पाळीव आणि सस्तन प्राणी आहे.

गायीला हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे. तसेच तिला गोमाता म्हणजे आपली आई असेही म्हटले जाते. गाय ही अतिशय उपयुक्त आणि घरगुती प्राणी आहे.

आमच्या भारत देशामध्ये प्राचीन काळापासून देवी म्हणून गायीची पूजा केली जाते. गाय ही सर्व प्राण्यांमध्ये पवित्र प्राणी आहे.

गायची शरीर रचना

गायचा स्वभाव हा खूप शांत असतो. गाय आकाराने मोठी असते. तसेच गायीला चार पाय, दोन शिंगे आणि दोन कान व एक शेपूट असते.

त्याच बरोबर गायीला एक मोठे नाक आणि एक डोके असते. भारत देशामध्ये गाय विभिन्न रंगांमध्ये पाहायला मिळते. गाय ही वेगवेगळ्या आकारात आढळते.

गायीचे अन्न

गायीचे मुख्य अन्न म्हणजे धान्य, हिरवे गावात आणि चारे खाते. तसेच तिला शेतातील हिरवे गावात खाण्याची सवय असते. गाय सगळ्यात प्रथम अन्न चांगल्या प्रकारे चावते आणि गिळते.

त्याला रवंथ करणे असे म्हटले जाते. काही शेतकरी गायीला कोंडा सुद्धा खायला देतात.जेव्हा तिला चरण्यासाठी सोडले जाते तेव्हा ती हिरवा पाला खाऊन आपले पोट भरते.

गायीच्या दुधाचे विविध पदार्थ

गायीचे दुध हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. संपूर्ण जगभरात गायीच्या दुधाचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जसे कि दही, ताक, तूप, लोणी, विविध प्रकारच्या मिठाई, खोया, पनीर आणि अन्य गोष्टी सुद्धा बनवू शकतो.

गाईचे दुध पचण्यायोग्य असते. गाईचे दुध आपल्याला मजबूत आणि निरोगी बनवते. तसेच प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. गाईचे दुध डॉक्टर आजारी असलेल्या लोकांना पिण्यास सांगतो. गायीचे दुध लहान मुलांना प्यायला दिल्यास मुले चपळ होतात.

गायीचे शेण

गायीचे शेण हे उत्तम खात म्हणून वापरले जाते. ग्रामीण भागातील महिला शेणाचे चपटे गोल बनवून उन्हात सुकवतात आणि त्यांचा उपयोग पावसाळ्यात इंधन म्हणून करतात. तसेच अनेक विधींमध्ये शेणींचा उपयोग केला जातो.

गायीचे शेण हे झाडांना खाद म्हणून घातले जाते. तसेच गायीच्या गोमुत्रामुळे बरेचसे आजार दूर होतात. गायीचे गोमुत्र हे फक्त पवित्रच नाही आहे तर त्यामध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी गुण सुद्धा आहेत.

हिंदू धर्मात महत्त्व

गायीचा हिंदू धर्मात भरपूर महत्त्व आहे. कारण हिंदू धर्मामध्ये गायीची पूजा केली जाते. तिला पवित्र समजले जाते आणि गायीची हत्या करणे हे मोठे पाप समजले जाते. भारतीय हिंदू धर्मात गायीला आईच्या रूपाने मानले गेले आहे.

प्राचीन काळी राजे – महाराजे ब्राह्मणांना सोन्यासोबत गाई दान करता असत. करण त्या काळी गायीला सोन्या इतकेच मूल्यवान समजले जायचे.

गाय ही १२ महिन्यानंतर एक लहान वासराला जन्म देते. गाय ही आपल्या वासराला धावणे आणि चालणे शिकवत नाही. परंतु वासरू जन्मानंतर स्वतःच चालू आणि धावू लागते.

निष्कर्ष

आमच्या जीवनामध्ये गायीचे अधिक महत्त्व आहे. गाय ही आपल्या आईसारखीआहे. ज्या प्रमाणे आपण आईचा सम्मान करतो त्याच प्रमाणे गायीचा सुद्धा सम्मान केला पाहिजे.

तसेच तिला कोणतीही दुखापत नाही केली पाहिजे. तिला योग्य वेळी आहार आणि पाणी दिले पाहिजे. त्याच बरोबर कोणत्याही व्यक्तीने गायीची हत्या करू नये.

For any other query regarding the Marathi Essay on Cow, you can ask us by leaving your comment below.

Updated: November 5, 2019 — 10:51 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *