नाताळ मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Christmas

प्रस्तावना

आमचा भारत देश हा विविधता आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. या भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. प्रत्येक धर्माचा सण आणि संस्कृती व भाषा ही वेगवेगळी आहे.

तरीपण या भारत देशात सर्व सण हे अन्य धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने साजरे करतात. म्हणून या भारत देशाला सणांचा देश असे म्हणतात. भारत देशात साजरे केले जाणाऱ्या सर्व सणांपैकी नाताळ हा एक ख्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे.

नाताळ सण का साजरा केला जातो 

नाताळ हा सण वर्षाचा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण भगवान येशू यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

आमच्या भारत देशामध्ये नाताळ हा सण दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. देवाचा पुत्र मानले जाणारे येशू प्रभूंच्या जन्माचा दिवस हा ख्रिश्चन लोकांसाठी मानला जातो.

नाताळ सणाचे महत्त्व

भगवान येशू हेच होते ज्यांनी लोकांना नवीन जीवन जगण्याची शिकवण दिली. तसेच त्यांनी सर्व प्रकारच्या दुःख आणि पीडापासून तारण केले.

असा विश्वास आहे कि, ज्यावेळी भगवान येशू यांचा जन्म झाला होता तेव्हा समाजामध्ये लोभ, द्वेष, अंधश्रद्धा, हिंसा इ. वाईट प्रथा रूढ होत्या. ईश्वराने त्यांना लोकांना सत्याचा मार्ग दाखविण्यासाठी पाठविले होते.

जेणेकरून ते लोकांमधील अंधकार, अशांतता, दुःख आणि त्रास हे दूर करून लोकांना सत्याचा मार्ग दाखवतील.

ख्रिसमसची सणाची तयारी

ख्रिसमस सणाची तयारी ही एक महिन्या आधीच सुरु केली जाते. या दिवशी ख्रिश्चन लोक घर, चर्च साफ – सफाई करतात.

या सणाला बाजारपेठा सुद्धा सजवल्या जातात. ख्रिसमस सणाला बाजारपेठा या ख्रिसमस कार्ड, भेटवस्तू, खेळणी इ अनेक प्रकारच्या वस्तुंनी भरलेले असते.

ख्रिसमस झाड

नाताळ हा सण ख्रिसमस झाडाशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही. बऱ्याच काळापासून ख्रिसमस झाडाची सजावट करण्याची प्रथा आहे. ख्रिसमस झाड हे प्रभू येशू यांचे प्रतीक मानले जाते. नैसर्गिकरित्या देवदार वृक्ष ख्रिसमस झाड म्हणून वापरले जाते.

या झाडावर सर्व प्रकारचे तारे, बलून, बाहुल्या, पक्षी, फुले आणि भेटवस्तू घालून सजवले जाते. असा विश्वास आहे कि, ख्रिसमस झाड हे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा संक्रमित करते वाईट विचार दूर करते.

सांताक्लॉजचे वर्णन

सांताक्लॉज किंवा सेंट निकोलस हे ख्रिसमस सणाचा एक अविभाज्य घटक आहेत. सांताक्लॉज ही काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत ‘नाताळ बाबा’ असे म्हटले जाते. ख्रिसमस या उत्सवाबद्दल छोटी मुले खूप उत्सुक असतात.

सांताक्लॉजचे चित्रण सामान्यतः बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली आणि चष्मा लावलेली अशी व्यक्ती असते. त्या व्यक्तीजवळ लहान मुलांसाठी भेटवस्तू देण्यासाठी एक भरलेली पिशवी असते.

ख्रिसमस भेट

ख्रिश्चन धर्माचे लोक या दिवशी चर्चमध्ये जाऊन ख्रिस्ती देवाला प्रार्थना करतात. नाताळची गाणी गातात. प्रभू येशू समोर आपल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. या दिवशी मित्र आणि नातेवाईकांना कार्ड देण्याची परंपरा आहे.

नाताळाच्या दिवशी सर्व ख्रिश्चन लोक एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देतात. नाताळाच्या दिवशी सर्व मित्र आणि नातेवाईक एकमेकांच्या घरी जातात. लहान मुले या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात. कारण त्यांना बऱ्याच भेटवस्तू आणि चॉकलेट मिळतात.

ख्रिसमस सणाला केकचे महत्व

या सणाला केकचे खूप महत्व आहे. काही ख्रिश्चन लोक हे एकमेकांना भेट म्हणून केक देतात. ख्रिश्चन लोकांच्या घरी या सणाला विविध प्रकारचे फळांचे केक बनवले जातात.

निष्कर्ष

ख्रिसमस हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. हा सण लोकांमधील प्रेम आणि आपुलकीचा उत्तेजन देतो. ख्रिसमस हा सण आपल्याला प्रभू येशू यांच्या शिकवणीतून क्षमा आणि बंधुताची भावना देतो.

अशा प्रकारे ख्रिसमस हा सण लोकांना एकसाथ राहण्याचा संदेश देतो. भगवान येशू म्हणायचे कि, गरीब आणि दुखी लोकांची सेवा करणे हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.

For any other query regarding the Marathi Essay on Christmas, you can ask us by leaving your comment below.

Updated: November 5, 2019 — 9:44 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *