माझी मातृ भूमी वर निबंध – वाचा येथे Majhi Mathrubhumi Essay In Marathi

प्रस्तावना:

माझी मातृ भूमी. मातृभूमी म्हणजे आपण ज्या धर्तीवर जन्म घेतला. ज्या मातीत जन्माला आलो. ती मातृ भूमी.

माझी मातृभूमी  

मी भारतात राहते म्हणून माझी मातृभूमी हि भारत आहे. जसे शेतकऱ्यांसाठी तो ज्या जमिनीवर राहतो. जिच्यातून तो पीक काढतो. तिला कसतो, दिवस रात्र तिची काळजी घेतो. त्यात उगणाऱ्या धान्याची काळजी घेतो. त्याची लागवड करतो.

ती त्याची मातृभूमी असते. मातृ म्हणजे आई आणि भूमी म्हणजे धरती. सरळ शब्दात सांगायचे तर धरती माता. प्रत्येक देशातला व्यक्ती ज्या जमिनीवर राहतो, तिला आपली मातृभूमी म्हणतो.

मातृभाषा

मातृभूमी प्रमाणे मातृभाषा असते. जर मी भारतात राहते, इथे अनेक जाती धर्माचे लोक राहतात, पण त्यांची मातृभाषा त्यांच्या मूळ गावावरून केली जाते. तेथील मातृभाषा जी असेल तीच बोली तो बोलतो.

मातृभूमीचे वैशिष्ट्य

प्रत्येक व्यक्तीला आपल्या देश बद्दल आणि आपल्या मातृभूमी बद्दल प्रेम असते. आपण नेहमी म्हणतो याच मातीत जन्माला आलो या मातीतच मारणार. हेच आपल्या देशाला आणि मातृभूमी ला एक आपली अदारंजली  असते.

कारण ह्याच मातिती जे अन्न आपला शेतकरी मित्र कष्ट करून उगवतो. रात्रंदिवस त्याची काळजी घेतो. ऊन वारा पाऊस याचे त्याला भान नसते. फक्त आपली धरती माय त्याला माहित असते. कारण तिच्या काळजावर नांगर चालवून तो आपले व आपल्या जनतेचे पोट भरण्याचे काम करतो.

मातृभूमीच्या अपमान

आपण कधी याचा विचार केला का आपण या धर्तीवर किती अत्याचार करत आहोत. या धर्तीवर पाप किती वाढले आहे, माणूस माणसाला मारत आहे. रेप, बलात्कार, चोरी, खून, दंगली सारखे प्रकार या धर्तीवर होत आहेत. नको तिथे घाण, कचरा प्रदूषण झाडे तोडणे, गाड्यांचा धूर यामुळे वातावरण तर प्रदूषित होतच आहे आणि आपली मातृभूमी पण घाण होत आहे.

थोरांची मातृभूमी

हि थोरांची मातृभूमी आहे. ज्यांनी हा मायभूमीला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. ब्रिटिशांनी आपल्याला गुलाम बनविले होते तेव्हा हेच थोर व्यक्ती कशाचीही पर्वा न करता आपल्या मातृभूमीला स्वतंत्र देण्यासाठी धडपडत होते.

वीर सावरकर, गांधीजी, नेताजी सुभाष चंद्र बोस, भागत सिंग, हे सर्व आपले खरे देश भक्त आहेत. त्यांनी जे केले ते आपण करूही नाही शकत.

सच्चा मातृभूमीच्या देशभक्त

आपण आता काय करतो आपल्या मातृभूमी साठी. काहीच नाही. आपला शेतकरी आपल्या धरतीला कसतो. तिच्यातून पीक उत्पन्न करतो. आपला सैनिक आपल्या मातृभूमीला परकीय शत्रू पासून वाचविण्यासाठी दिशेच्या सीमेवर सतत डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. म्हणून आज आपण शांत पणे झोपू शकतो.

आणि आपण फक्त अरे देवा असे नको व्हायला होते. पण हा विचार आपण का करत नाही कि एक आई आपल्या पोटच्या गोळ्याला आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर पाठवते. तिचे काळीज किती मोठे आहे. सलाम आहे त्या मातेला जिने असे पुत्र जन्माला घातले.

निष्कर्ष:

आपल्या मातृभूमी साठी आपले प्रेम कमी होता काम नये. हीच आपली शान आहे. मला गर्व आहे कि मी भारतीय आहे.

Updated: March 17, 2020 — 1:37 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *