माझा भाऊ वर निबंध – वाचा येथे Majha Bhau Essay On Marathi Language

प्रस्तावना:

माझा भाऊ. तो आज नाही या जगात पण तो अस्तित्वात नसला म्हणून काय झाले तो सतत माझ्या आठवणीत आहे. भाऊ आपला पाठीराखा. वडील नसले तर वडिलांची जागा घेणारा असा एकच आपला भाऊ.

भाऊ बहिणीचं प्रेमी

आम्ही चार बहिणी आणि २ भाऊ. मी सर्वात लहान आणि सर्वांची लाडकी. भाऊ बहिणीचे प्रेम हे एक जगावेगळे नाते आहे. राग-भांडण मस्ती मारामारी सर्व चालते. त्याला जास्त प्रेम किंवा तिला जास्त प्रेम म्हणून सुद्धा भांडणे होतात.

आणि यात रुसून बसते ती बहिणाबाई आणि तिला मानवणारा फक्त एकच तो म्हणजे भाऊ. रक्षा बंधन आले कि महागडे कपडे किंवा पैसे मागण्याचा हट्ट. आधी असे काही न्हवते काळा सोबत सणाचे महत्व पण बदलत चालले आहे. आता भाऊच भावाचा वैर बनत चाललं आहे.

आई वडिलांनी कामविलेल्या जागेसाठी वाटा मागणारे भाऊ आज दिसत आहेत. वाहिनी घरात अली म्हणून बहिणीचे हाल होतात हे आपण पाहत आहोत.

भाऊ पाठीराखा

भाऊ हा एखाद्या आधार स्तंभा सारखा आपल्या मागे उभा असतो. वडील नसले तर त्यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन नोकरी कष्ट करून घराला आधार देतो. असे भाऊ आज खूप कमी दिसतात.

माझ्या दादाने माझे घर खूप छन सांभाळले आणि आम्हाला सुद्धा. मी लहान असताना सर्व बहिणी राखी बांधायला यायच्या कारण सर्वांची लग्न झाली होती. पण मी एकटी लाडाची एका कोपऱ्यात उभी राहायची, पण तो समजून जायचा मला पहिली राखी बांधायची आहे. म्हणून तो सर्वाना मुद्दाम ओरडून बोलायचं पहिली मोठी ताई राखी बांधणार मग तुम्ही सर्व मोठी ताई म्हणजे मी. आणि मी पण खुश धावत येऊन पहिली राखी बांधायला मला मिळाली म्हणून आनंद गगनात मावत नसायचा.

मला काय आवडते काय नाही हे फक्त त्यालाच कळायचे आणि माझे हट्ट पण तोच पूर्ण करायचा. आईने जेवढे मला सांभाळले नसेल तेवढे त्याने मला सांभाळ आहे. माझी आई तोच आणि बाबा हि तोच होता. पण आज त्याला खूप मिस करते. कारण आज तो नाही आमच्यात पण माझ्या आठवणीत नक्कीच आहे तो.

त्याची शिकवण

त्याने नेहमी खूप लाडाने प्रेमाने मला शिकवले. आई ओरडली तर दादाच्या मागे जाऊन लपायचे. आणि मग आई दादाला हळूच मारायची आणि तो रडल्यासारखा करायचा तर मी आईशी भांडायला उठायचे माझ्या दादाला मारू नकोस. म्हणून आरडाओरडा करायची आजही हे सर्व जेव्हा मी माझ्या मुलांना सांगते तेव्हा ते हि हसतात.

पण हे सर्व सांगण्या मागे एकच उद्दिष्ट असे कि माझ्या मुलांमध्ये हि भाऊ बहिणेचे प्रेम निर्मळ राहावे. आयुष्यभर दोघांनी एकमेकांना साथ द्यावी.

कठोर आणि प्रेमळ असा भाऊ

भाऊ हा कधी कठोर हि होतो. आपली बहीण कुणाच्या नादाला लागू नये. कुठले चुकीचे पाऊल उचलू नये असे त्याला वाटते. पण वेळ पडली तर तो जीव देण्यासाठी सुद्धा तयार असतो.

भाऊ बहिणीचे नाते मित्र मैत्रिणी सारखे असते. ज्या गोष्टी आई बाबाना सांगू शकत नाही, त्या सर्व गोष्टी भाऊ बहीण एकमेकांसोबत बोलू शकतात. दुःख सुख विभाजून घेतात भाऊ आणि बहीण.

वेळेला त्याने मला समजावले सुद्धा आहे, आणि मी कुठे चुकले तर त्याने कठोर पण हि घेतला आहे. त्याचीच शिकवण आज मी माझ्या मुलांना देऊ शकते.

रक्षाबंधन

रक्षा बंधन हि खूप छान कल्पना आपल्या पूर्वजांनी काढली आहे. एक छोटासा धागा कसा भाऊ बहिणाला एकत्र करून  ठेवतो. हे तो दिवस खूप छान पाणे सांगून जातो. भाऊ बहीण सखे असो वा सावत्र , किंवा दूरचे प्रेम बहीण भावाचे कधी वेगळे होत नाही. आणि बाहेरचे कोणी आले तरी हा विचार करू नका कोणी आपले नाते तोडू शकतो.

सारांश:

भाऊ बहिणेचे नाते खूप पवित्र आहे. त्याला तसेच पवित्र राहू द्या.

Updated: March 17, 2020 — 1:14 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *