गाय मराठी निबंध – वाचा येथे Essay in Marathi on Cow

प्रस्तावना

गाय ही एक पाळीव प्राणी आहे. आमच्या भारत देशामध्ये गायीला विशेष स्थान देण्यात आले आहे. प्राचीन काळी ऋषी – मुनी आपल्या आश्रमात गायी पाळत असत.

गाय अतिशय उपयुक्त प्राणी आहे. भारतात हिंदू धर्माचे लोक गायीला गाय म्हणत नाहीत तर तिला आपला माता म्हणून तीची पूजा करतात. गाय ही संपूर्ण जगात आढळून येते.

गायची रचना

गायीचा स्वभाव हा खूप शांत असतो. गायीला चार पाय, दोन डोळे आणि एक शेपूट असते. तसेच दोन कान, एक नाक असत. गाय विभिन्न रंगांमध्ये आणि आकारामध्ये आढळून येते.

गायीच्या शरीराचा आकार खूप मोठा असतो. गाईच्या पिल्लाना वासरू किंवा पाडस म्हटले जाते. गाय या प्राण्याला गोठ्यामध्ये ठेवले जाते. गायीच्या बचावासाठी दोन शिंगे असतात.

पण गाय कधी कोणाला मारत नाही. गाय आपल्या झुपकेदार शेपटीचा उपयोग अंगावर बसणाऱ्या माश्या उडवण्यासाठी केला जातो.

गायीचा मुख्य आहार

Eassy on cowगायीचा मुख्य आहार गवात आणि चारा आहे. त्याच प्रमाणे काही लोक हे गायीला कोंडा सुद्धा खायला घालतात. तसेच गाय हि तृणधान्ये आणि इतर पदार्थाचे सेवन करते.

गायीला शेतातली हिरवे गवत खाण्याची सवय असते. गाय गवत व चारा तसेच इतर पदार्थ रवंथ करून खाते. गायीला विशेष प्रकारचे अन्न लागत नसल्यामुळे तिला पाळण्यासाठी जास्त खर्च येत नाही.

गाय हा प्राणी १२ महिन्यानंतर एक लहान वासराला जन्म देते. गाय आपल्या वासराला धावणे आणि चालणे शिकवत नाही तर ते जन्मानंतर स्वतः चालू आणि धावू लागते.

गायीच्या दुधाचे पदार्थ

गायीचे दूध हे खूप पौष्टिक असते. त्यामुळे काही लोक हे आपल्या लहान मुलांना गायीचे दूध प्यायला देतात. त्यामुळे मुले चपळ होतात. तसेच गायीच्या दुधाला सर्वश्रेष्ठ मानले जाते.

संपूर्ण जगभरात गायीच्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जसे की दही, ताक, लस्सी, तूप आणि लोणी इ तसेच विविध प्रकारच्या मिठाई, खोटी, पनीर आणि अन्य पदार्थ गायीच्या दुधापासून तयार करतात.

गायीचे दूध हे पचण्यास योग्य असते. त्याच प्रमाणे गायीचे दूध हे आपल्याला मजबूत आणि निरोगी बनवते. गायीचे दूध प्यायल्यास प्रतिकार शक्ती वाढते.

गाईच्या शेणाचा उपयोग

गाईच्या शेणाचा उपयोग हा खत म्हणून केला जातो. गावातील लोक हे गायीच्या शेणाचे चपटे गोल बनवून उन्हात सुकवतात आणि त्यांचा उपयोग पावसाळ्यात इंधनाच्या रूपाने करतात. तसेच अनेक विधींमध्ये शेणींचा उपयोग केला जातो.

तसेच गायीचे शेण हे झाडांना खत म्हणून घातले जाते. त्याच प्रमाणे गायीचे गोमूत्र हे बरेचसे आजार दूर करते. गायीचे गोमूत्र हे पवित्रच मानले जात नाही तर त्यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुण सुद्धा असतात.

हिंदू धर्मात गायीला महत्त्व

हिंदू धर्मामध्ये गायीला फार महत्त्व आहे. कारण हिंदू धर्मामध्ये गायीची पूजा केली जाते. तिला भारतीय हिंदू धर्मात सर्वात जास्त पवित्र समजले जाते आणि तिची हत्या करणे पाप समजले जाते.

प्राचीन काळी राजे – महाराजे हे ब्राह्मणांना सोन्यासोबत गायी दान करत असत. त्याकाळी गायीला सोन्या इतकेच मूल्यवान समजले जात असे.

गायीच्या जाती

गायीच्या अनेक जाती आहेत. पण भारत देशातील मुख्य म्हणजे साहिवाल (पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश व बिहार ) गिर गाय (दक्षिण काठियावार ) तसेच विदेशीजातीमध्ये जर्सी गाय ही सर्वात लोकप्रिय आहे. ही गाय अधिक दूध देते. भारतीय गाय ही लहान असते. तर परदेशी गायीचे शरीर हे वजनदार असते.

निष्कर्ष

आमच्या सर्वांच्या जीवनात गायीला खूप महत्त्व आहे. आपण सर्वानी गायीचा सम्मान केला पाहिजे. तसेच तिला कोणतीही दुखापत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आमच्या भारत देशामध्ये गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे कारण ती आयुष्यभर आपल्याला काही ना काही देत असते.

For any other query regarding the Essay in Marathi on Cow,  you can ask us by leaving your comment below.

Updated: November 5, 2019 — 1:06 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *