नाताळ मराठी निबंध – वाचा येथे Christmas on Marathi Essay

प्रस्तावना

आमच्या भारत देशामध्ये अन्य प्रकारचे सण हे साजरे केले जातात. भारत देशाचे सर्व सण विविध धर्माचे आणि जातीचे लोक हे एकसाथ साजरे करतात. परंतु प्रत्येक धर्माचे सण हे वेगवेगळे आहेत.

तरी पण या भारत देशामध्ये विविधता दिसून येते. ज्या प्रमाणे दिवाळी, दसरा, होळी, गणेश उत्सव इ. अनेक सण हिंदू धर्माचे प्रमुख सण आहेत.

त्याच प्रमाणे नाताळ व ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा मुख्य सण आहे. नाताळ हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

नाताळ हा सण केव्हा साजरा केला जातो

आमच्या भारत देशामध्ये दरवर्षी नाताळ हा सण २५ डिसेंबरला साजरा केला जातो. नाताळचा हा दिवस प्रभू येशु ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. काही ख्रिश्चन अनुयायी हा सण सायंकाळी साजरा करतात. तर बऱ्याच ठिकाणी हा सण मध्यरात्री साजरा केला जातो.

नाताळ हा सण कसा साजरा करतात 

नाताळ या सणाच्या दिवशी भारतात सुट्टी दिली जाते. तसेच या दिवशी ख्रिस्ती धर्माचे लोक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात.

त्याच बरोबर ख्रिश्चन लोक आपले घरे सजवतात आणि चर्चला सुद्धा सजवले जाते. या  सणाच्या वेळी घरामध्ये विविध गोड पदार्थ बनवले जातात.

भेटवस्तू देण्याची प्रथा

नाताळ या सणाच्या दिवशी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. विशेषतः लहान मुलांना या सणाची खूप हौस व आवड असते.

ख्रिश्चन लोक या सणाच्या दिवशी दिवाळी प्रमाणे करंज्या व इतर खाद्य पदार्थ एकमेकांना आदान – प्रदान करतात. तसेच लहान मुलांना सांताक्लॉज मध्ये नेऊन विशेष भेटवस्तू दिल्या जातात.

ख्रिसमस ट्री

नाताळ या सणाच्या दिवशी ख्रिश्चन लोक आपल्या घराच्या अंगणात ख्रिसमस ट्री उभारतात. ख्रिसमस ट्री हा सुचीपणी वृक्षापासून बनलेला असतो. त्याला सुंदर प्रकारे सजवले जाते.

ख्रिसमस ट्री हा लहान मुलांचे मौजे, छोट्या प्रतिमात्मक काठ्या, छोट्या घंटा आणि भेटवस्तू लावून सजवला जातो. तर काही ठिकाणी म्हणजेच प्रार्थनास्थळी प्रभू येशू  यांच्या जन्माचा देखावा मांडला जातो.

सांताक्लॉज वर्णन

सांताक्लॉज हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सांताक्लॉज हि एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला ‘नाताळबाबा’ असे म्हटले जाते.

सांताक्लॉजचे वर्णन हे बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली अशी व्यक्ती असते. तसेच लहान मुलांसाठी भेटवस्तू भरलेली मोठी पिशवी त्यांच्या जवळ असते.

भारत देशात नाताळ हा सण

भारत देशामध्ये नाताळ या सणाच्या दिवशी प्रत्येक चर्च मध्ये सकाळी प्रार्थना केली जाते. या दिवशी चर्चमध्ये जास्त प्रमाणात गर्दी असते. यादिवशी लहान मुले, स्त्रिया आणि पुरुष नवीन कपडे घालून चर्चमध्ये जातात.

नाताळ या सणाला भारतामध्ये सार्वजनिक सुट्टी असते. तसेच ख्रिष्टी मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.

खाद्य पदार्थ

नाताळ या सणाच्या दिवशी लोक आपापल्या घरी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करतात. तसेच विविध प्रकारचे केक सुद्धा तयार केले जातात. नाताळच्या दिवशी काही लोक उपवास करतात. या सणाच्या निमित्ताने फळे घातलेला विशेष केक, चॉकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार अनेक पदार्थ तयार केले जातात.

दुकानांची सुंदरता

नाताळ या सणाच्या दिवशी रस्ते, घरे, दुकाने हे सर्व मोठ्या आकर्षतेने आणि सुंदर रोषणाईने सजवले जातात.या सणाच्या दिवशी दुकानांमध्ये विविध वस्तूंच्या किमतीवर सवलती दिल्या जातात. तसेच काही लोक नाताळ हा सण संध्याकाळी बाहेर जाऊन साजरा करतात.

निष्कर्ष

अशा प्रकारे नाताळ हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. भगवान येशू यांचे जीवन अद्वितीय होते म्हणून नाताळ हा सण पवित्र सण आहे.

For any other query regarding the Christmas on Marathi Essay, you can ask us by leaving your comment below.

Updated: November 5, 2019 — 10:18 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *